Sunday, 24 May 2020

राजस्थान सफर - 2019

नमस्कार.
        मी काही लेखक नाही आणि तशी लिहायची सवयही नाही. पण आज थोडं लिहावेसे वाटले म्हणून लिहीलं. आम्ही 8 नोव्हेंबर 2019 ला राजस्थान सफर करून आलो. सफर महणजे राजस्थानातला छोटासा भाग फिरून आलो. उदयपूर, जोधपूर, जैसलमेर आणि माउंट आबू. सर्वच खूपच सुंदर. मुख्यतः तिथले गड - किल्ले बघितले इतके सुंदर आणि टापटीप व्यवस्था. आपल्या महाराष्ट्रातही किल्ले आहेत पण त्याची तितकीशी देखभाल केली जात नाही हे तिथं गेल्यावर जाणवलं. तिथल्या प्रत्येक किल्ल्यावर जाण्यासाठी शुल्क आकारले जाते. आणि त्याचा वापर किल्ल्याच्या डागडुजी व एकंदर खर्चासाठी केला जातो.
चित्तौडगड राजस्थान
जैसलमेर राजस्थान 

Tent @ जैसलमेर 

उंट सफ़ारी
मला व्यक्तीशः असे वाटते की महाराष्ट्रातही अशीच मोहीम राबवली तर! तिकडे किल्ल्यावर जायला वेळेचे बंधन आहे. संध्याकाळ नंतर कोणालाही प्रवेश नाही. आवडलं बुवा आपल्याला. अस आपणही केलं तर आपल्या रायगडावर भामटे पार्टी करायला जाणार नाहीत.
तसेच राजस्थानमधील रस्ते इतके मस्त 👌एकही खड्डा नाही. त्या रस्त्यावरून जाताना मला आपला मुंबई गोवा महामार्ग आठवला. नेहमी त्या महामार्गावरून जाताना होडीत बसल्याचा फिल येतो. तुम्हालाही नक्कीच जाणवलं असेलच! असो.
लिहीण्याचा हेतू एवढाच की महाराष्ट्रातील महामार्ग आणि आपले गड किल्ले सुधारले पाहिजेत.

जय महाराष्ट्र.
                                          

                                          

                                 

सपना कद्रेकर






8 comments:

  1. Ho khup changli gosht ahe. Maharashtra goverment ne ikde laksh dene garjeche ahe

    ReplyDelete
  2. Waaa...mstch Rani... khupch Chann

    ReplyDelete
  3. खरच अश्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण व्हायला पाहिजे. राणी तुलाही धन्यवाद,चांगला विचार मांडलास🙏

    ReplyDelete

एक प्रवास

     मी रत्नागिरी सारख्या लहानशा शहरातून, जिल्ह्यातून मुंबईत आले. माझ लाॅ पूर्ण झाल्यावर मला मास्टरी साठी मुंबई युनिवर्सिटी मधे अ‍ॅडमिशन ...